Month: January 2026

लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आनंदमेळावा उत्साहात संपन्नलोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व चैतन्यमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, उपक्रमशीलतेला व सर्जनशीलतेला वाव देणारा हा आनंदमेळावा पालक, शिक्षक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अधिकच रंगतदार ठरला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस आदरणीय विवेकानंदजी भांडारकर हे होते. तर डॉ. दिपाली साळुंखे, नगरसेविका रूपाली शिवदे तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व मनोरंजक स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडविले. पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉलधारकांची निवड केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जितेंद्र बेडसे, राहुल सरदार व किशोर बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सुस्पष्ट व प्रभावी परिचय करून दिला. संपूर्ण शैक्षणिक संकुलात आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाघ यांनी प्रभावीपणे केले.या आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाची संधी मिळाल्याने शिक्षणासोबतच आनंद, आत्मविश्वास, सहकार्य व नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी भावना उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.

लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आनंदमेळावा उत्साहात संपन्नलोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय...

Read MoreRead more about लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आनंदमेळावा उत्साहात संपन्नलोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व चैतन्यमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, उपक्रमशीलतेला व सर्जनशीलतेला वाव देणारा हा आनंदमेळावा पालक, शिक्षक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अधिकच रंगतदार ठरला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस आदरणीय विवेकानंदजी भांडारकर हे होते. तर डॉ. दिपाली साळुंखे, नगरसेविका रूपाली शिवदे तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व मनोरंजक स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडविले. पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉलधारकांची निवड केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जितेंद्र बेडसे, राहुल सरदार व किशोर बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सुस्पष्ट व प्रभावी परिचय करून दिला. संपूर्ण शैक्षणिक संकुलात आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाघ यांनी प्रभावीपणे केले.या आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाची संधी मिळाल्याने शिक्षणासोबतच आनंद, आत्मविश्वास, सहकार्य व नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी भावना उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.

लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल अग्रवाल; सामाजिक उपक्रमांची घोषणा

अमळनेर/ आबिद शेख लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा सन २०२६–२०२७ या कार्यकाळाचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण...

राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्धांना जगण्याचा आधार. खा. स्मिता वाघ. अमळनेर तालुक्यातील १२३५ ज्येष्ठ नागरिकांना १ कोटी २० लाखांचे जीवनोपयोगी साहित्य वाटप..

अमळनेर/ आबिद शेख राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे जीवनोपयोगी साहित्य हे त्यांच्या जगण्याचा खरा आधार आहे. वृद्ध माता-पित्यांच्या...

होमी भाभा फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलचे घवघवीत यश..

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर येथील श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या...

माणुसकीची जिवंत मिसाल – अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांची गरजू कुटुंबाला जीवनदान देणारी मदत..

अमळनेर | आबिद शेख अहमदाबादहून भागलपूरकडे प्रवास करत असताना एका लहान मुलाची प्रकृती अचानक अत्यंत गंभीर बनली. मुलाची तब्येत खालावल्याने...

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे उपविभागीय कार्यालयावर ‘बोंबा बोंब’ निवेदन; विविध शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याची मागणी..

अमळनेर |आबिद शेख क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रविकांत तुपकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. शरद...

अमळनेर बाजार समितीतील पदभरती प्रक्रियेवर टांगती तलवार. परीक्षा केंद्राबाबत खुलासा व अनुमती पत्राची मागणी; युवक काँग्रेसचा आक्षेप..

अमळनेर |आबिद शेख अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा आयोजनाबाबत स्पष्ट...

अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप आज; खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून आयोजन..

अमळनेर /आबिद शेख केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत अमळनेर येथे पात्र वयोवृद्ध नागरिकांना सहाय्यक...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर; आमदार अनिल भाईदास पाटील यांचा समावेश..

आबिद शेख/अमळनेर महाराष्ट्र राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर...

अमळनेर नगर परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड निर्विरोध..

अमळनेर | आबिद शेख सोमवारी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत व निर्विरोध पार पडली....

You may have missed