मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला मुदतवाढ ; महाराष्ट्रात 13 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार, अंतिम यादी 15 नोव्हेंबरला*
24 प्राईम न्यूज 31Oct 2026

:निवडणूक आयोगाने केंद्रशासित प्रदेशासह 12 राज्यांमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाचा (SIR) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, हरयाणा, तेलंगणा आणि नागालँड या पाच राज्यांमधील SIR चे वेळापत्रक बदलण्यात आले असून दिल्लीतील कार्यक्रमालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने संबंधित राज्ये आणि दिल्लीला स्वतंत्र पत्र पाठवले आहे.

*महाराष्ट्रात काय बदल?*
महाराष्ट्रातील मतदार यादीसंदर्भातील दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरवरून वाढवून *13 नोव्हेंबर* करण्यात आली आहे.
नोटीस बजावण्याची आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया आता *14 नोव्हेंबरपर्यंत* सुरू राहणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी *15 नोव्हेंबर रोजी* प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापूर्वी दावे आणि हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत 7 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती, त्यात आता वाढ करण्यात आली आहे.

