स्वप्नील पाटील यांची जिल्हा पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड अमळनेरच्या साने गुरुजी विद्या मंदिरातील उपशिक्षकाला मान; निवडीनंतर शाळेसह शहरात जल्लोषात स्वागत.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिराचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या निवड प्रक्रियेदरम्यान पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राकेश पाटील, प्रसन्ना बोरोले, आशिष पवार, अविनाश घुगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. स्वप्नील पाटील यांच्या निवडीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड जाहीर होताच साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत तसेच अमळनेर शहरातील भगवा चौकात त्यांचे शिक्षक, सहकारी आणि हितचिंतकांकडून उत्साहात अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

