माणुसकीची जिवंत मिसाल – अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांची गरजू कुटुंबाला जीवनदान देणारी मदत..

0
New-Doc-01-21-2026-23.40.jpg


अमळनेर | आबिद शेख
अहमदाबादहून भागलपूरकडे प्रवास करत असताना एका लहान मुलाची प्रकृती अचानक अत्यंत गंभीर बनली. मुलाची तब्येत खालावल्याने संबंधित कुटुंबाला तातडीने अमळनेर येथे प्रवास थांबवावा लागला. मुलाची अवस्था चिंताजनक होती. तापमान १०४ अंश फॅरेनहाइट, ऑक्सिजन पातळी ८४, नाडीचा वेग प्रतीमिनिट १६० तर श्वसन दर प्रतीमिनिट २७ इतका होता.

शेवटचे 3 दिवस आजच खरेदी करा | लकी कूपन मिळवा | मोठी बक्षिसे जिंका!
संपर्क :- 7074742121


या कुटुंबाकडे ना उपचारासाठी पैसे होते, ना पुढील प्रवासाचे तिकीट, तसेच खाण्या-पिण्याचीही कोणतीही व्यवस्था नव्हती. अशा कठीण परिस्थितीत अल्लाहच्या कृपेने त्यांची भेट येथील इमाम साहेबांशी झाली. त्यांनी तत्काळ या कुटुंबाला अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या ओपीडी केंद्रात आणले.
येथे तात्काळ डॉ. फिरोज शेख यांना पाचारण करून मुलावर उपचार सुरू करण्यात आले. योग्य व वेळेवर उपचार मिळाल्याने मुलाची प्रकृती हळूहळू सुधारली. सध्या मुलाची तब्येत स्थिर व समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली.
अल-खिदमत ट्रस्टच्या वतीने केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर संबंधित कुटुंबासाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था तसेच पुढील प्रवासासाठी तिकीटाचीही सोय करून देण्यात आली. त्यामुळे या गरजू कुटुंबाला मोठा आधार मिळाला.
आज अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या दुसऱ्या ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ओपीडीमध्ये एकूण ७१ रुग्णांनी तपासणी करून मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, डॉ. फिरोज शेख यांनी सकाळची ओपीडी पूर्ण केल्यानंतरही सायंकाळी ७ वाजता पुन्हा ओपीडी केंद्रात उपस्थित राहून संबंधित मुलाला जवळपास दोन तास निरीक्षणाखाली ठेवले. त्यांची ही निस्वार्थ सेवा भावना खऱ्या अर्थाने समाजसेवेची जिवंत उदाहरण ठरली आहे.
अल्लाह तआला अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या या नेक नियती व मानवतावादी कार्याला कबूल करो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed