होमी भाभा फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेरच्या मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलचे घवघवीत यश..

0
New-Doc-01-22-2026-07.48.jpg


अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर येथील श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल ९६ संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची आणि सर्जनशीलतेची चुणूक दाखवली.

शेवचे 3 दिवस तुमच्या स्वप्नातील दागिन्यांसोबत तुमची स्वप्नंही साकार करा


या स्पर्धेत चंदन पाटील याने रजत पदक पटकावले, तर सौम्य पाटील व मोहित वानखेडे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. तसेच अर्जुन देसले आणि ऋषी सोनवणे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत मौल्यवान अनुभव मिळवला.
या यशाच्या जोरावर संबंधित विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोबोटिक्स मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर, रितिक शिखर जैन, योजना ठक्कर, संगीता पाटील तसेच शाळेच्या विज्ञान विभागाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, ॲडमिनिस्ट्रेटर दीपिका मुंदडा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को-ऑर्डिनेटर योजना ठक्कर तसेच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमळनेर शहरातून या चिमुकल्या तंत्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed