अमळनेर नगर परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड निर्विरोध..

0
New-Doc-01-20-2026-09.47.jpg


अमळनेर | आबिद शेख
सोमवारी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत व निर्विरोध पार पडली. नगर परिषदेतील विविध समित्यांवर सभापतीपदासाठी झालेल्या निवडीत सर्व पदांवर एकमताने निर्णय घेण्यात आला.


निर्माण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक साहेबराव वसंत पवार यांची निवड करण्यात आली. जलापूर्ति समितीच्या सभापतीपदी कैलास नामदेव पाटील, तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी रामकृष्ण बापूराव पाटील यांची निर्विरोध निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापतीपदी शेख नविद अहमद मुशिरोद्दीन, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वाती सुरजसिंह परदेशी यांची निवड जाहीर करण्यात आली.
तसेच योजना व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम यांची निर्विरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात.
स्थायी समितीच्या सदस्यपदी शिवसेना गटातून श्रीराम भगवान चौधरी, अपक्ष गटातून महेश प्रभाकर देशमुख, तर शहर विकास आघाडीच्या वतीने भरत सुरेश ललवानी यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी मयूर भंगाले यांनी केली.
या निवड प्रक्रियेप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. विविध समित्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed