जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर; आमदार अनिल भाईदास पाटील यांचा समावेश..
आबिद शेख/अमळनेर
महाराष्ट्र राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने ही स्टार प्रचारकांची यादी अंतिम करण्यात आली असून संबंधित नावे राज्य निवडणूक आयोगाकडे कळविण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसमावेशक व विकसनशील भूमिका, पुरोगामी तसेच परिवर्तनवादी लोकाभिमुख विचारधारा राज्यातील तळागाळातील जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी या स्टार प्रचारकांवर असणार आहे. अनुभवी नेतृत्व, जनसंपर्क आणि कार्यक्षम प्रचाराच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टार प्रचारक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
