लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आनंदमेळावा उत्साहात संपन्नलोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व चैतन्यमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, उपक्रमशीलतेला व सर्जनशीलतेला वाव देणारा हा आनंदमेळावा पालक, शिक्षक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अधिकच रंगतदार ठरला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस आदरणीय विवेकानंदजी भांडारकर हे होते. तर डॉ. दिपाली साळुंखे, नगरसेविका रूपाली शिवदे तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व मनोरंजक स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडविले. पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉलधारकांची निवड केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जितेंद्र बेडसे, राहुल सरदार व किशोर बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सुस्पष्ट व प्रभावी परिचय करून दिला. संपूर्ण शैक्षणिक संकुलात आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाघ यांनी प्रभावीपणे केले.या आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाची संधी मिळाल्याने शिक्षणासोबतच आनंद, आत्मविश्वास, सहकार्य व नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी भावना उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.

0

लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आनंदमेळावा उत्साहात संपन्न
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व चैतन्यमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, उपक्रमशीलतेला व सर्जनशीलतेला वाव देणारा हा आनंदमेळावा पालक, शिक्षक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अधिकच रंगतदार ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस आदरणीय विवेकानंदजी भांडारकर हे होते. तर डॉ. दिपाली साळुंखे, नगरसेविका रूपाली शिवदे तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक व मनोरंजक स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडविले. पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट स्टॉलधारकांची निवड केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जितेंद्र बेडसे, राहुल सरदार व किशोर बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सुस्पष्ट व प्रभावी परिचय करून दिला. संपूर्ण शैक्षणिक संकुलात आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाघ यांनी प्रभावीपणे केले.
या आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाची संधी मिळाल्याने शिक्षणासोबतच आनंद, आत्मविश्वास, सहकार्य व नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी भावना उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed