लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल अग्रवाल; सामाजिक उपक्रमांची घोषणा

0
New-Doc-01-22-2026-09.14.jpg


अमळनेर/ आबिद शेख
लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा सन २०२६–२०२७ या कार्यकाळाचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात पार पडला. या वेळी अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल (अचल) अग्रवाल, तर खजिनदारपदी भाग्यश्री मणियार यांची अधिकृत निवड करण्यात आली.

शेवटचे 3 दिवस आजच खरेदी करा | लकी कूपन मिळवा | मोठी बक्षिसे जिंका!
संपर्क :- 7074742121


पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्षा कविता पारेख होत्या. कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट पी.आर.ओ. जॅस्मिन भरुचा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच इन्स्टॉलिंग ऑफिसर व पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कंचन शाह, परमिंदर कॉलरा, कल्पना शहा, डॉ. मंजुश्री जैन, नयना नवसारीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शपथविधी पार पडल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत बॅज प्रदान करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कविता पारेख यांनी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, सेवाभावी व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. लिनेस क्लबच्या सेवाभावी कार्याचा ठसा उमटवत, सकाळी नर्मदा वाडी येथे गरजूंसाठी अन्नदान कार्यक्रम वर्षा दोधिवाला यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आला.
संध्याकाळी ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत नेहा कासोदेकर (LLB) यांचा गौरव करण्यात आला. तसेच देशसेवेत कार्यरत असलेले सैनिक अतुल बाविस्कर (गांधली) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी खा. शि. मंडळ, अमळनेर येथे महिला संचालकपदी निवड झाल्याबद्दल लिनेस लीना पाटील, तसेच नुकतीच LLB पदवी प्राप्त केल्याबद्दल क्लब सदस्या नम्रता हिंदुजा यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया जैन व रुपाली सिंघवी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सचिव आचल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमानंतर सौहार्दपूर्ण वातावरणात हळदी-कुंकू समारंभ पार पडला.
या पदग्रहण सोहळ्यास क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. मयुरी जोशी, तसेच सोनल जोशी, रश्मा काटारिया, रुपाली मुंदडा, आशा महाले, राजुल गांधी, शितल पाटील, रुपाली पहाडे, अलका नांदा, सोनल पवार, भारती धनगर यांच्यासह क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed