वक्फ बचाव समिती जळगावकडून आंदोलनाची रूपरेषा जाहीर..

0
New-Doc-09-26-2025-06.27.jpg

24 प्राईम न्यूज 26 Sep 2025

जळगाव :ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा वक्फ बचाव समितीने वक्फ कायद्याविरुद्ध आंदोलनांची मालिका जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मौलवी, बुद्धिजीवी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांच्या रक्षणासाठी ही आंदोलने पूर्णपणे शांततापूर्ण व संवैधानिक पद्धतीने होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

आंदोलनाची रूपरेषा :

३ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) : जळगाव शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत बंद ठेवण्यात येणार.

१६ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) : जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध व घोषणाबाजी करून मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन सादर केले जाईल.

२७ ऑक्टोबर २०२५ (सोमवार) : जीएस ग्राउंडवर दुपारी १२ ते २ आंदोलन, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा व दुपारी ३ ते ५ “जेल भरो” आंदोलन.

२ नोव्हेंबर २०२५ (रविवार) : वक्फ कायद्याच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी सर्व समुदायांच्या प्रतिनिधींची गोलमेज बैठक आयोजित केली जाईल.

बैठकीत अध्यक्ष मुफ्ती खालिद व संयोजक फारूक शेख यांनी समाजातील सर्व घटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अनीस शाह, वहिदत शकील सर, अतिक शाह, आरिफ देशमुख, मौलाना उमर नासिर, मौलाना कासिम नदवी, साजिद मणियार, मौलाना इम्रान काकर, रज्जाक पटेल, झाकी इद्रिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वक्फ बचाव समितीने घेतलेले हे आंदोलनाचे पाऊल जिल्ह्यात ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117000

22 Ct सोने 91.60% : ₹. 107600

18 Ct सोने 75.00% : ₹. 88900

शुद्ध चांदी 999%:₹. 1400/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed