अमळनेरच्या कुस्ती चळवळीला नवे बळ; पै. प्रविणकुमार पाटील शहराध्यक्षपदी.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर शहर व परिसरात कुस्ती क्षेत्राला अधिक संघटित स्वरूप देण्याच्या उद्देशाने पै. प्रविणकुमार पाटील यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील आखाडे, वस्ताद, पैलवान, क्रीडा संघटक आणि कुस्तीप्रेमींना एका व्यासपीठावर आणून कुस्तीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ग्रामीण भागातील होतकरू मल्लांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच अमळनेर शहरातील कुस्ती स्पर्धांना चालना देणे, पारंपरिक आखाडा संस्कृतीचे जतन करणे आणि गुणवंत पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
पै. प्रविणकुमार शांताराम पाटील यांच्या निवडीमुळे अमळनेरच्या कुस्ती क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कुस्ती चळवळीला अधिक संघटित, व्यापक आणि गतिमान स्वरूप मिळेल, असा विश्वास कुस्तीप्रेमींकडून व्यक्त करण्यातयेत आहे.

दरम्यान, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी, पैलवान, वस्ताद, क्रीडा संघटक, क्रीडा पत्रकार आणि कुस्तीप्रेमींनी पै. प्रविणकुमार पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed