अमळनेरमध्ये श्री बालाजी प्लायवुडचे भव्य उद्घाटन..

0
New-Doc-09-25-2025-21.11.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : गेल्या ३५ वर्षांपासून “गणेश प्लायवुड” या नावाने ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या महाजन परिवाराकडून आता आणखी एक नवीन पाऊल टाकण्यात आले आहे. प्लायवुड, लॅमिनेट, हार्डवेअर व फर्निचर साहित्याच्या सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध करून देणारे “श्री बालाजी प्लायवुड” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन व शुभारंभ सोहळा शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.

हा सोहळा मा. नगरसेवक श्री. दादासाहेब सोमा नामदेव माळी व मा. उपनगराध्यक्ष श्री. आण्णासाहेब पांडुरंग नामदेव माळी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

निमंत्रक म्हणून श्री. अनिल पांडुरंग महाजन, श्री. दीपक पांडुरंग महाजन, चि. प्रिन्स लक्ष्मण महाजन (सिव्हिल इंजिनिअर), श्री. लक्ष्मण पांडुरंग महाजन (संचालक, अर्बन बँक, अमळनेर), चि. हितेश अनिल महाजन (इंटेरियर डिझायनर), चि. मुकेश व चि. हिमेश लक्ष्मण महाजन उपस्थित राहणार आहेत.

पत्ता : शॉप नं. २३१/२३२, शिवांश बिझनेस हब, चर्चच्या बाजूला, धुळे रोड, अमळनेर.

हा उपक्रम अमळनेरकरांना फर्निचर व इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117000

22 Ct सोने 91.60% : ₹. 107600

18 Ct सोने 75.00% : ₹. 88900

शुद्ध चांदी 999%:₹. 1400/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed