कसाली मोहल्ल्यात किल्ला टेक परिसरात वाकलेला वीज खांब; नागरिकांच्या जीवाला धोका महावितरणकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष; दुर्घटना होण्यापूर्वी खांब दुरुस्त करण्याची मागणी.

0

अमळनेर/आबिद शेख


अमळनेर  : अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला, किल्ला टेक परिसरात महावितरणचा वीज खांब खालच्या बाजूपासून पूर्णपणे वाकलेला असून, हा खांब सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. खांबाच्या बाजूने अरुंद रस्ता असून या रस्त्यावरून नागरिक व वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे हा खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.


या धोकादायक वीज खांबाबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी करूनही संबंधित वायरमन व अधिकाऱ्यांकडून अद्याप गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. खांबाची अवस्था दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


किल्ला टेक परिसरात नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हा खांब असल्याने महावितरणने तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी. खांबाची स्थिती दुरुस्ती करण्यायोग्य नसल्यास तो काढून नवीन खांब बसवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
जीवितहानी होण्यापूर्वी महावितरणने तातडीने कार्यवाही करून हा धोकादायक वीज खांब सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed