New-Doc-09-26-2025-09.19.jpg

अमळनेर । हेडावे रस्त्यावर आयशर गाडी आणि दोन मोटरसायकल अपघातात पती पत्नी जागीच ठार झाली असून एक जण जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की २५ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हेडावे रस्त्यावर दोन मोटारसायकल आणि आयशर अशा तिहेरी अपघात एकरूखी येथील विश्वनाथ हिंमत भिल वय ३० आणि ज्योती विश्वनाथ भिल वय २५ हे जागीच ठार झाले असून दुसरा मोटारसायकल चालक बाळू साहेबराव पाटील ५० हा जबर जखमी झाला आहे.

आयशर गाडीवाला गाडी घेऊन पळाल्याचे समजते.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने पथक पाठवले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी आणि मृतांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे. दरम्यान या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून तिहेरी अपघातामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117000

22 Ct सोने 91.60% : ₹. 107600

18 Ct सोने 75.00% : ₹. 88900

शुद्ध चांदी 999%:₹. 1400/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed