अमळनेर तालुक्यात महिनाभरानंतर मुसळधार पाऊस; नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा.

0

अमळनेर | आबिद शेख 

 

 

अमळनेर तालुक्यात शुक्रवारी रात्री महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागातही अर्धा तास ते तासभर मुसळधार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेती पिकांवर त्याचा परिणाम जाणवत होता. अनेक भागांत पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली होती. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, आगामी काळातही समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम आहे. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


महिनाभराच्या खंडानंतर झालेल्या या पावसाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed