अमळनेरच्या सुरेश कांबळे यांना ‘युवा पुरस्कार’ने गौरविले! पाचोऱ्यातील उत्तर महाराष्ट्र स्तरीय सोहळ्यात कार्याचा सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान.

0

अमळनेर /आबीद शेख
अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय सोहळा २०२६’ मध्ये अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’चे श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘युवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. १० तारखेला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे आणि खान्देश उपाध्यक्ष डॉ. विजय गाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री. कांबळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


श्री. सुरेश हिरामण कांबळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दाखवलेली निष्ठा, समर्पण, कार्यातील सातत्य आणि समाजहितासाठी दिलेले योगदान यांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत असून, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे.
अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशाबद्दल श्री. सुरेश कांबळे यांच्यावर अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed