सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला! तिकीटदरांत ८० टक्क्यांपर्यंत वाढ; सर्वसामान्यांना आर्थिक फटका.

0

24प्राईम न्यूज 14 oct 2026

मुंबई : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान प्रवास महागडा ठरत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता विविध विमान कंपन्यांनी तिकीटदरांत तब्बल ३० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना महागड्या तिकिटांचा सामना करावा लागत आहे.
ऐन सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांना नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट अधिक पैसे मोजावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. विशेषतः नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.


सणांचा आनंद घेण्यासाठी गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांना वाढीव विमानभाड्यामुळे प्रवासाचा निर्णय घेणेही कठीण झाले आहे. अचानक वाढलेल्या तिकीटदरांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांनी दरवाढीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed