श्री झूलेलाल मंदिरातील विद्युत सर्व्हिस वायर स्थलांतरित करण्याची मागणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रवी कुमार अंदानी यांचे महावितरणला निवेदन.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर : शहरातील सिंधी कॉलनी, चोपडा रोड, गुरुनानक नगर परिसरातील श्री झूलेलाल मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरातील विद्युत सर्व्हिस वायर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात रवी कुमार बलराम अंदानी यांनी महावितरणच्या अमळनेर येथील सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.


निवेदनात नमूद केल्यानुसार, गुरुनानक नगर परिसरात श्री झूलेलाल मंदिर असून, मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येत असतात. मंदिर परिसरातील विद्युत सर्व्हिस वायरमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही वायर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची तपासणी करावी आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत सर्व्हिस वायर स्थलांतरित करण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रवी कुमार बलराम अंदानी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed