अमळनेर तालुका कुस्ती संघाची निवड चाचणी ६ डिसेंबरला; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पैलवानांना संधी.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा २०२६-२७ साठी अमळनेर तालुका कुस्ती संघाच्या वतीने तालुकास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलात पार पडणार असून १५, १७ व २० वर्षांखालील कुमार गट तसेच वरिष्ठ गटातील मुलांसाठी फ्री स्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेसाठी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत वजन घेण्यात येणार असून सकाळी १०.३० वाजता कुस्ती स्पर्धांना प्रारंभ होईल.
वयोगट व वजन गट पुढीलप्रमाणे :
१५ वर्षांखालील कुमार गट : ३८, ४१, ४४, ४८, ५२, ६७, ६८, ७५ व ८५ किलो.
१७ वर्षांखालील कुमार गट : ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ व ११० किलो.
२० वर्षांखालील मुलांचा फ्री स्टाईल गट : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५ किलो.
२० वर्षांखालील मुलांचा ग्रीको-रोमन गट : ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो.
वरिष्ठ पुरुष ग्रीको-रोमन गट : ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७ व ९७ किलो.
महाराष्ट्र केसरी गट : ग्रीको-रोमन प्रकारात ८७ ते १३० किलो वजन गटासाठी स्पर्धा होणार आहे.
खेळाडूंसाठी आवश्यक कागदपत्रे :
कुमार गटातील खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला, मेडिकल सर्टिफिकेट आणि पालकांचे संमतीपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच पासपोर्ट, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र ही मूळ कागदपत्रे व प्रत्येक कागदपत्राची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
या निवड चाचणी स्पर्धेतून जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्याचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळू), संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान, प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार व प्रवीण कुमार पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९७०९३६५१०, ९०२८३०५७३०, ९६०४४३३७१४.
— अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ

