ंदोलनाला भाजीपाला असोसिएशनचा पाठिंबा; उद्या अमळनेरचा भाजीपाला मार्केट बंद.

0

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन आणि बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अमळनेर येथील भाजीपाला असोसिएशनने एक दिवस भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे उद्या शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी भाजीपाला लिलाव बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी विक्रीसाठी आपला भाजीपाला मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन किरकोळ भाजीपाला विक्रेता असोसिएशन व भाजीपाला अडत असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed