अमळनेर तालुक्यात पोलिसांची धडक कारवाई; गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त सुमारे १०० ठिकाणी छापे; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट.

0

अमळनेर /आबीद शेख
अमळनेर : विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अवैध गावठी दारूची निर्मिती, विक्री आणि सेवनाला आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान सुमारे १०० ठिकाणी छापे टाकून पावणेदोन लाख रुपये किमतीची गावठी दारू व कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.


तालुक्यातील विविध भागांत गावठी दारूची निर्मिती व विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष कारवाई केली. टाकरखेडा, ताडेपुरा कंजरवाडा, फापोरे, कन्हेरे, सडावण, बड्या देहू धरण परिसर, जळोद, गांधलीपुरा, नगाव, शिरूड आणि तांबेपुरा यांसह विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले.
या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त करून गावठी दारूच्या व्यवसायाला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारूविक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आणि शरद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अमळनेर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत विलास गायकवाड, चि.पा. सोनवणे, हरी ठाकूर पाटील, गोपाल पाटील, संदेश पाटील, राहुल पाटील, संतोष शिसोदे, गणेश पाटील, रमेश पारधी, मोनिका पाटील, सागर सांख्ये, उदय बोरसे, सुनील पाटील, मिलिंद सोनमार, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, मंगल भोई, लक्ष्मीकांत शिंपी, राजेंद्र देशमाने, विजय भोई आणि दीपक पाटील यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधातील ही मोहीम पोलिसांकडून राबविण्यात आली असून, अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed