डॉ. विशाल शेलकर यांचे अस्थिरोगशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण! लवकरच अमळनेरमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस; वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे नेणार.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर : येथील डॉ. विशाल राजेंद्र शेलकर यांनी SVSM – Sri Venkata Sai Medical College मधून अस्थिरोगशास्त्रातील (M.S. Orthopaedics) पदव्युत्तर वैद्यकीय पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे शेलकर कुटुंबासह माळी समाज आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


डॉ. विशाल शेलकर हे अमळनेरचे माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू, तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेलकर आणि सौ. लता शेलकर यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.
शेलकर कुटुंबात वैद्यकीय सेवेची परंपरा असून डॉ. विशाल यांचे मोठे बंधू डॉ. तुषार राजेंद्र शेलकर हे त्वचारोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. शीतल तुषार शेलकर या एमबीबीएस, डीओएमएस (डीएनबी) पदवीधारक नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे डॉ. राजेंद्र शेलकर यांच्या लहान भगिनीचे पुत्र डॉ. उप्लेश संतोष महाजन (एमबीबीएस, डीजीओ, डीएनबी) हे स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. पंकज संतोष महाजन (एमबीबीएस, एमडी, डीएनबी) हे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ, तर डॉ. मयूर संतोष महाजन (एमबीबीएस, डीएनबी) हे भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हे तिन्ही डॉक्टर अमळनेर येथील गणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील या कौटुंबिक परंपरेत डॉ. विशाल शेलकर यांनीही अस्थिरोगशास्त्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर शहरातच रुग्णसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे.
याबाबत डॉ. विशाल शेलकर यांनी सांगितले की, शिक्षण पूर्ण झाले असून लवकरच अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयाजवळील कृषी विभागाच्या इमारतीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची योजना आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अमळनेर शहरासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed