नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालिका सौ.जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर :- जळगाव जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.

तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीने याबाबत विनम्र आवाहन करण्यात आले होते.कार्यकर्त्यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली होती.यास सर्वांनीच प्रतिसाद दिला.मात्र जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असल्याने त्यांच्या प्रेमापोटी दिवसभरात शेकडो हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.यासोबतच जळगाव जिल्हा बँकेत प्रथमच अमळनेर तालुक्यातुन जयश्री पाटील यांच्या रूपाने एका महिला संचालकाची बिनविरोध निवड झाल्याने याबद्दलही त्यांचे सर्वानी अभिनंदन केले.रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी सुरू होती.यात प्रामुख्याने महायुती व सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी जि प व प स सदस्य, शेतकी संघ, फ्रुटसेल, मार्केट पदाधिकारी,ग्रामिण सरपंच,विकासो पदाधिकारी, पोलिस पाटील, आजी माजी नगरसेवक,सामाजिक व व्यापार क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव व महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा समावेश होता.
दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासह जिल्हा भरातील जेष्ठ नेते व पदाधिकारी यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

