निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी संबंधित कर्मचाऱ्यांना अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह सीबीआय चौकशीची मागणी.

0

अमळने/आबीद शेख

अमळनेर : निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला न्याय मिळावा आणि या घटनेमागील सत्य समोर यावे, यासाठी समस्त अमळनेर तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले. निहारिका कोळी यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून संबंधित प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी भूषण कोळी, रावसाहेब कोळी, भिकन कोळी, हिरामण कोळी, मधुकर सोनवणे, सागर कोळी, शरद पाटील, स्वप्निल पाटील, विनोद सोनवणे, चेतन कोळी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed