रोटरी क्लब अमळनेरतर्फे २०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप तांबेपुरा येथील सी. आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट.
अमळनेर/ आबीद शेख

अमळनेर — रोटरी क्लब अमळनेरतर्फे तांबेपुरा परिसरातील सी. आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना आकर्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सुविधा मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे महेश पाटील, रोटे चेलाराम सेनानी, प्रोजेक्ट चेअरमन विनोद थोरात, रोटे प्रदीप पारख, रोटे विवेक देशमुख, रोटे दिलीप भावसार, रोटे सी. बी. वशिष्ठ, रोटे अजय रोडगे, रोटे मनोज पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शाळेतर्फे प्राचार्या सौ. नूतन पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या उपयुक्त भेटीबद्दल शाळेच्या वतीने रोटरी क्लबचे आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाची माहिती मकसूद बोहरी यांनी दिली.

