राजे संभाजी नगरात १५ फुट खोल शोषखड्ड्यात पडलेल्या गाभण गायीला अग्निशमन दलाने दिले जीवदान.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर : राजे संभाजी नगर येथे आज, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाण्याने भरलेल्या सुमारे १५ फूट खोल शोषखड्ड्यात गाभण गाय पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती समाजसेवक जालू चौधरी यांनी तत्काळ अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिली.


माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश गोसावी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अग्निशमन दलाचे पथक तात्काळ राजे संभाजी नगरात दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करत पाण्याने भरलेल्या खोल शोषखड्ड्यातून गाभण गायीला सुखरूप बाहेर काढले. या बचावकार्यात फायरमन दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, आनंदा झिबल, मच्छिंद्र चौधरी आणि लखन कंखरे यांनी विशेष प्रयत्न केले.


अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गाभण गायीचे प्राण वाचले. या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल राजे संभाजी नगर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाचे अभिनंदन करून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed