टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त मानवसेवेचा उपक्रम; जिल्हा रुग्णालयात अन्नदान रुग्ण आणि नातेवाईकांना भोजनाचे वाटप; दोन जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

0

नंदुरबार/ प्रतिनिधी

 

सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या उपक्रमात जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसह त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करत गरजूंची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वच्छता निरीक्षक संदीप अहिरे, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान, काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, पत्रकार राजेंद्र बुवा, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्नदानाच्या या उपक्रमातून मानवतेची सेवा, सामाजिक एकोपा आणि गरजूंच्या मदतीचा आदर्श संदेश देण्यात आला. फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed