दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन.

0

अमळनेर/आबीद शेख 


जळगाव : महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान दुष्काळग्रस्त भागाची पिकपाहणी तसेच नागरिकांच्या निवेदनांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दुष्काळ निवारणासाठी विविध मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले.


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या उद्देशाने कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या ‘वनशेती’ धारक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच जिल्हा सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज निश्चित करण्याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, शेतीनिष्ठ शेतकरी निळकंठ पाटील आणि पप्पू सूर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed