पोलिस कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्तीसाठी ‘खान्देश कन्या’ गुंजन पाटील यांची हास्य-काव्य मैफिलआज.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळताना पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा तणावपूर्ण आणि धावपळीच्या परिस्थितीत काम करावे लागते. त्यांच्या या व्यस्त दिनचर्येत काही क्षण आनंदाचे आणि मनोरंजनाचे मिळावेत, या उद्देशाने अमळनेर येथे विशेष हास्य-काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘खान्देश कन्या’ म्हणून परिचित असलेल्या कवयित्री गुंजन पाटील यांची विशेष हास्य-काव्य मैफिल रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. आपल्या खास शैलीतील काव्य, विनोद आणि मनोरंजक सादरीकरणातून गुंजन पाटील उपस्थितांना खळखळून हसविण्यासोबतच तणावमुक्त वातावरण निर्माण करणार आहेत.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल पाटील राहणार असून, कृषिभूषण साहेबराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, अमळनेर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत तसेच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पोलिस कुटुंबीयांसाठीही विशेष व्यवस्था
पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही या मैफिलीचा आनंद घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘कार्य संध्या मैफिल आयोजक समिती’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, पोलिस अधिकारी-कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेला मिळणार नवा आयाम
अमळनेर शहर व तालुक्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासोबतच महाराष्ट्राची लोकधारा आणि साहित्य-संस्कृती जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शोकी संघाचे संचालक विक्रांत भास्कराव पाटील, जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष वरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील भोई, भूषण महाजन, विजय राजपूत, अक्षय साकी, यश वर्मा तसेच कवी शरद धनगर यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed