धनदाई महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुरुष गटात धरणगाव महाविद्यालय, महिला गटात प्रताप महाविद्यालय अमळनेर विजयी.
अमळनेर/आबीद शेख

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समितीच्या वतीने धनदाई महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध महाविद्यालयांतील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. चुरशीच्या सामन्यांमुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. नयनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एरंडोल विभागाचे सचिव प्रा. डॉ. देवदत्त पाटील व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंत पाटील उपस्थित होते.

स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांचे संघ व्यवस्थापक व क्रीडा संचालक सहभागी झाले होते. यामध्ये प्रा. डॉ. हर्ष सरदार, प्रा. डॉ. क्रांती क्षीरसागर, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. दीपक पाटील, प्रा. मुकुंद शिरसाट यांच्यासह धनदाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. राहुल इंगळे, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. डॉ. महादेव तोंडे, कैलास आहिरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शैलेश पाटील यांनी केले. पंच म्हणून प्रा. डॉ. देवदत्त पाटील, क्रीडा शिक्षक क्षितीज सोनवणे, निखिल पाटील, भगत, आदित्य राज, दक्ष पाटील, साहिल तसेच अन्य हॉलीबॉलप्रेमींनी जबाबदारी पार पाडत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

धनदाई महाविद्यालयाच्या मैदानाची व्यवस्था, नियोजन आणि स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या खेळाडू व उपस्थित प्रेक्षकांनी मैदानासह एकूण व्यवस्थेचे कौतुक केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी क्रीडाभावना जपत दमदार कामगिरी केली.
एरंडोल विभाग क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती आणि स्पर्धात्मक भावना विकसित होण्यास मदत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
चौकट : स्पर्धेचा निकाल
पुरुष गट :
🥇 प्रथम क्रमांक – धरणगाव महाविद्यालय
🥈 द्वितीय क्रमांक – बांभोरी ए.एस.सी. कॉलेज
🥉 तृतीय क्रमांक – एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी
एकूण सहभागी संघ – ९
महिला गट :
🥇 प्रथम क्रमांक – प्रताप महाविद्यालय, अमळनेर
🥈 द्वितीय क्रमांक – डी.डी.एस.जी.पी. कॉलेज, चोपडा
🥉 तृतीय क्रमांक – धरणगाव महाविद्यालय
एकूण सहभागी संघ – ६

