सडावण बुद्रुक येथे अनधिकृत मुरुम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : मौजे सडावण बुद्रुक, ता. अमळनेर येथे महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत अनधिकृत गौण खनिज (मुरुम) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग मयूर भंगाळे तसेच तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अनधिकृत मुरुम वाहतूक करताना आढळून आलेले दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली व संबंधित मुद्देमाल ताब्यात घेऊन तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे दिसून आले.

या कारवाईत पी. एस. पाटील, मंडळ अधिकारी वावडे भाग, तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील (शिरसाळे बु.), मुकेश देसले (पाडसे), भूषण पाटील (कळमसरे), कल्पेश कुवर (फाफोरे बुद्रुक), संदीप माळी (मांडळ), एम. आर. पाटील (जैतपीर) आणि अमोल चक्रे (जवखेडे) यांनी सहभाग घेतला.

