अमळनेरमध्ये शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रारंभ; २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार उपक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाला शुक्रवारपासून (दि. १३ नोव्हेंबर) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर येथे उत्साहात सुरुवात झाली. हे प्रशिक्षण १३ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

या प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीनुसार शिक्षकांनी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान, नवनवीन अध्यापन पद्धती आणि अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे. त्याचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वयक म्हणून किरण शिसोदे काम पाहत असून सहसमन्वयक व विषयतज्ज्ञ म्हणून तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रशांत पाटील आणि किशोर पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.

तसेच निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी आनंदा बापू धनगर, सर्जेराव शिसोदे, सोपान भवरे, रवींद्र देवरे यांच्यासह अन्य अनुभवी तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.

या दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यापनातील नवीन कौशल्ये, शैक्षणिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून त्यांच्या व्यावसायिक क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed