गलवाडे रोडवर दुचाकी-चारचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : शहरातील गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकीन दुकानाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गलवाडे रोडवरून जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाशी स्वादिष्ट नमकीन दुकानाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात तनवीर शेख सुपडू मणियार आणि जागीर खा शेर खा पठाण हे दोघे जखमी झाले.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक फिरोज पठाण, अयाज बागवान, नईम पठाण, इरफान मणियार, छोटू भाई आणि आसिफ बापू यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी पुढाकार घेतला.

जखमी तनवीर शेख सुपडू मणियार यांना अमळनेर येथील डॉ. अनिल शहा यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जागीर खा शेर खा पठाण यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.

अपघातामुळे गलवाडे रोड परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed