प्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न एलिमेंटरीचे ५४३ तर इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला (चित्रकला) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात सुरळीतपणे संपन्न झाली. दि. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील सुमारे ३० शाळांमधून एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.


एलिमेंटरी परीक्षेसाठी ५४३, तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेच्या विविध सत्रांमध्ये वस्तुचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, भूमिती तसेच अक्षरलेखन आदी विषयांचे पेपर घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कलात्मक गुणवत्ता सादर केली.
अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांनी या परीक्षेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी तालुक्यातील कला शिक्षकांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जबाबदाऱ्या पार पाडल्या.
परीक्षेचे केंद्र समन्वयक डी. एन. पालवे व सहसमन्वयक के. व्ही. पाठक यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच मुख्याध्यापक ए. डी. भदाणे, लिपिक सागर पवार, प्रसाद गोसावी यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांचे सहकार्य लाभले.
सहभागी शाळा


या परीक्षेत श्रीमती डी. आर. कन्या शाळा, पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, लोकमान्य विद्यालय, साने गुरुजी कन्या स्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, श्री. एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अल फैज उर्दू हायस्कूल, श्रीराम गबाजी सोनवणे विद्या मंदिर भरवस, बालाजी विद्यालय गांधली-पिळोदे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिवद, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंमळगाव, नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांडळ, सु. ह. मुंदडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मारवड, माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द, दत्त माध्यमिक विद्यालय पातोंडा, माध्यमिक विद्यालय दोधवद, डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय चौबारी, एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर, कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय धार-मालपुर, बी. बी. ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे, झेड. डी. सोनवणे हायस्कूल मुडी, माध्यमिक विद्यालय लोण बुद्रुक, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, के. व्ही. पाटील माध्यमिक विद्यालय सारबेटे तसेच पिंगळवाडे शासकीय आश्रमशाळा आदी शाळांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed