अमळनेर नगरपरिषदेचा सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य-सुरक्षा उपक्रम नमस्ते कार्ड, आयुष्मान भारत कार्ड व पीपीई किटचे वाटप; उल्लेखनीय सेवेसाठी कर्मचाऱ्यांचा गौरव अमळनेर नगरपरिषदेचा सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य-सुरक्षा उपक्रम.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी मित्रांसाठी आरोग्य सुरक्षा व कल्याणपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘सफाई मित्र सुरक्षा अभियान’ अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना नमस्ते कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ आणि ‘नशामुक्त भारत’ करण्याची शपथ देण्यात आली.
‘स्वच्छ शहर, निरोगी कर्मचारी आणि सुरक्षित स्वच्छता व्यवस्था’ या उद्देशाने नगरपरिषदेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक कल्याणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, संतोष माणिक, किरण कंडारे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी व शिपाई मित्र उपस्थित होते.
या उपक्रमातून शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची जबाबदारी नगरपरिषद गांभीर्याने घेत असल्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed