पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांकडून जनजागृती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये जनजागृती व वृक्षारोपण उपक्रम राबविला.
प्राध्यापक डॉ. सुनंदा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज, पर्यावरण संरक्षण तसेच वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थी प्रतीक्षा पाटील, निकिता पाटील, रुचिका पाटील, नेहा पाटील, नूतन पाटील, सोनल पाटील व प्रज्ञा पाटील यांच्या पुढाकाराने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

यावेळी जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कदम तसेच शिक्षक आर. जे. पाटील उपस्थित होते. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत उपक्रमाची सांगता करण्यात आली.

