शुभम कोकीळ यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; भव्य रोजगार मेळाव्यात युवकांना रोजगाराची संधी.

0

24 प्राईम न्यूज 22 Sep 2026
चाकण : शुभम संतोष कोकीळ परिते यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी, तर विनोद अनिल भोळे यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती सोहळ्याच्या निमित्ताने चाकण येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साई कॉम्प्लेक्स, ऑफिस नं. ३०२, ईडन बँक, बालाजीनगर रोड, चाकण, पुणे येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील ४० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (MNC) सहभाग नोंदविला. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या माध्यमातून आपल्या करिअरला नवी दिशा देण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवडचे विद्यमान आमदार अण्णासाहेब बनसोडे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील, महाराष्ट्र महिला सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे, पुणे येथील नगरसेवक व लोकनेते महाराष्ट्र राज्यचे गोपाळराव यशवंतराव तंतरपाळे, अजितदादा पवार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकजदादा तंतरपाळे, जनसेवा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ आळंदीकर, प्रदेश अध्यक्षा मायाताई सिरसट यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, युवा उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष शुभम संतोष कोकीळ यांनी सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच युवकांना नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देत युवा पिढीला स्वावलंबी बनविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रोजगार निर्मिती, युवा सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed