एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! NCMC कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटासाठी मिळणार दिलासा; कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ.
अमळनेर/आबिद शेख

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासासाठी NCMC कार्डची अनिवार्यता लागू करण्याबाबत महामंडळाने प्रवाशांना दिलासा दिला असून, ही अट ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे

९ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांना कार्ड नोंदणी आणि उपलब्धतेसंदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ही अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेषतः महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट मिळण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक असले तरी, आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अद्याप NCMC कार्डची नोंदणी न केलेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांनी या मुदतवाढीचा लाभ घेत लवकरात लवकर आपले NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

