प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; लहान मुलींना चावा ३ वर्षीय चिमुकलीच्या मानेवर कुत्र्याचा हल्ला; नगरपरिषदेची पकड मोहीम सुरू.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शहरातील प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, या भागात लहान मुलींना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. प्रतापनगर भागातील मालिया शेख तौसिफ (वय ३ वर्षे) या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिच्या मानेवर चावा घेतल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर नगरपरिषदेकडून या परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी समाजसेवक राजूभाई काझी, बाळासाहेब संदनशिव, दीपक चौगुले तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने सहकार्य केले.


दरम्यान, अमळनेर शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे झुंड फिरताना दिसून येत असून, त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नगरपरिषदेने कायमस्वरूपी उपाययोजना करून शहरातील धोकादायक ठिकाणी विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed