अमळनेर तालुक्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचा थरार; १७ सप्टेंबरपासून विविध क्रीडा प्रकारांना सुरुवात.

0

अमळनेर/आबिद शेख 

 

अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ मधील शालेय शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे— बुद्धिबळ स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी सर्व गटातील मुले व १८ सप्टेंबर रोजी मुलींसाठी नोबल पोतदार स्कूल येथे होणार आहेत. बॅडमिंटन १८ सप्टेंबर रोजी मुले व १९ सप्टेंबर रोजी मुलींसाठी प्रताप कॉलेज हॉल येथे होईल. कुस्ती स्पर्धा २१ सप्टेंबर रोजी सर्व गटांसाठी तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.


तसेच फुटबॉल स्पर्धा २३ सप्टेंबर रोजी मुले व २४ सप्टेंबर रोजी मुलींसाठी प्रताप कॉलेज येथे, व्हॉलीबॉल २६ सप्टेंबर रोजी मुले व २७ सप्टेंबर रोजी मुलींसाठी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. कॅरम स्पर्धा ३ ऑक्टोबर रोजी मुले व ५ ऑक्टोबर रोजी मुलींसाठी अँड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.


कबड्डी स्पर्धा ७ ऑक्टोबर रोजी मुले व ८ ऑक्टोबर रोजी मुलींसाठी सायर देवी स्कूल येथे, तर खो-खो १० ऑक्टोबर रोजी मुले व १२ ऑक्टोबर रोजी मुलींसाठी आ. मा. पाटील आश्रमशाळा, रणाईचे येथे होणार आहे. क्रिकेट स्पर्धा १३ ऑक्टोबर रोजी मुले व १४ ऑक्टोबर रोजी मुलींसाठी प्रताप कॉलेज येथे होईल. मैदानी स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी मुले व १७ ऑक्टोबर रोजी मुलींसाठी तालुका क्रीडा संकुल येथे पार पडणार आहेत.
तालुक्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी व ऑनलाइन शुल्क प्रक्रिया पूर्ण करून, आवश्यक प्रवेशिका काढाव्यात तसेच संघ व खेळाडू स्पर्धेसाठी तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, एस. पी. वाघ आणि संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed