जळगाव जिल्हा बँक निवडणूक : अमळनेर सोसायटी मतदारसंघातून जयश्रीताई अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून सौ. जयश्रीताई अनिल पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीश पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन संजय पवार यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारातून समृद्धीकडे वाटचाल
सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांचे माध्यम नसून शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा विश्वासाचा भक्कम आधार आहे. या क्षेत्राच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी, सक्षम नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या हिताची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जयश्रीताई अनिल पाटील यांच्या उमेदवारीमुळे सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या आशा आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
सहकाराचा ध्यास… विकासाचा विश्वास… आणि जनहिताचा संकल्प..

