जळगाव जिल्हा बँक निवडणूक : अमळनेरमधून प्रफुल्ल पवार यांचा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अमळनेर तालुक्यातून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सोसायटी मतदारसंघातून अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती *प्रफुल्ल हिरालाल पवार* यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रफुल्ल पवार यांनी अर्ज दाखल केल्याने सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले असून, सहकार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उमेदवारीमुळे अमळनेर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व सभासदांचे लक्ष लागले आहे.

