यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!* *४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई

0

अमळनेर/आबिद शेख 

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु. येथील खेळाडूंनी विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी ४ × ४०० मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली. या शानदार कामगिरीच्या जोरावर सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे (वयोगट 17 वर्षाआतील मुले) विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट वेग, समन्वय, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेच्या क्रीडा यशात मानाचा तुरा रोवला.

रिले संघातील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे :
१) प्यारसिंग टिंका पावरा
२) राजकिरण अमाश्या पावरा
३) सवित सिताराम पावरा
४) रोहन खुशाल पावरा
५) पवन सायसिंग पावरा

या सर्व खेळाडूंची आगामी दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी बोईसर, ता. जि. पालघर येथे आयोजित राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक तथा क्रीडा प्रशिक्षक श्री. स्वप्निल एच. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून श्री. सतीश कागणे यांनी जबाबदारी सांभाळत खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
खेळाडूंच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा माईसो श्रीमती विद्याताई पाटील मॅडम, संस्थेचे सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक श्री. युवराज पाटील साहेब, संचालक ॲड. श्री. अभिजीतदादा पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावलचे प्रकल्प अधिकारी मा. श्री. अरुणजी पवार साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. पवन पाटील साहेब, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. राजेश जाधव, जळगाव DSO कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री. किशोर चौधरी, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक श्री. सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विभागीय स्तरावर मिळविलेल्या या यशानंतर आता राज्यस्तरावरही आपल्या कौशल्याचा ठसा उमटविण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन, सराव आणि संधी मिळाल्यास ते राज्यस्तरावरही यशाची नवी शिखरे गाठू शकतात, हे या खेळाडूंनी सिद्ध करून दाखविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed