अमळनेर तालुकाध्यक्षपदी पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची निवड.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

पै. प्रताप शिंपी हे अमळनेर शहरातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणूनही कार्य केले असून, जय हिंद व्यायामशाळा, अमळनेरचे अध्यक्ष म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. तसेच राजे शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ असून, तालुक्यातील कुस्तीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी व्यायामशाळा, आखाडे, कुस्ती स्पर्धा तसेच नवोदित मल्लांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचे पै. प्रताप शिंपी यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील होतकरू मल्लांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि स्पर्धांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अमळनेर तालुक्यात कुस्ती मल्लविद्येला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी, मल्ल, व्यायामशाळांचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

