एकलहरे विविध सोसायटीच्या जिल्हा बँकेच्या ठरावाच्या निवडणुकीत रत्नाबाई पाटील बहुमतांनी विजयी.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील एकलहरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या जिल्हा बँकच्या ठरावाच्या निवडणुकीत सौ.रत्नाबाई सयाजीराव पाटील यांनी बाजी मारली. संचालक मंडळातील एकूण 12 मतांपैकी तब्बल 8 मते मिळवत त्यांनी विजय मिळविला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश दिनकर पाटील यांना केवळ 3 मते मिळाली. तसेच एक संचालक वयक्तिक कारणास्तव गैरहजर होते

सौ. रत्नाबाई सयाजीराव पाटील यांच्या नावाची सूचना संचालक ज्ञानेश्वर हिलाल पाटील यांनी केली होती, तर सुरेश दिनकर पाटील यांच्या नावाची सूचना राकेश अभिमान कोळी यांनी केली. यानंतर उपस्थित संचालक मंडळामध्ये मतदान हे हात वरती करून घेण्यात आले. यात सौ.रत्नाबाई पाटील यांना 8 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

विजयानंतर सौ. रत्नाबाई सयाजीराव पाटील यांचे श्री डी एम पाटील,भाईदास नामदेव पाटील,वसंत गोरख पाटील,भिवंसन नामदेव पाटील, फत्तेलाल अर्जुन पाटील,भिला वना पाटील, बापू रामभाऊ माळी,संजय पंढरीनाथ पाटील, दिलीप यशवंत पाटील,पंढरीनाथ पुंडलिक वाघ, लहू अर्जुन पाटील वसंत विश्राम पाटील ,पितांबर झिपरु पाटील,भोजू भीका माळी, रवींद्र अंबर माळी, तुकाराम रामदास माळी,बन्सीलाल रामराव माळी, कांतीलाल नागो माळी,मधुकर साहेबराव पाटील,अशोक पोपट पाटील,सजन अर्जुन पाटील,गुलाब रंगराव पाटील,विश्वास अर्जुन पाटील, हिरालाल फुलसिंग भिल,बापू दौलत कोळी, मनोहर भाईदास कोळी,प्रमोद विनायक पाटील, सुधीर भिला पाटील, व अँड दिनेश दयाराम पाटील आदी ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीनंतर विजयी उमेदवार व संचालक मंडळाने आमदार अनिल भाईदास पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सौ रत्नाबाई सयाजीराव पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

