वावडेतील सहकाराचा अनोखा आदर्श; अवघ्या दोन रुपयांत जिल्हा बँकेसाठी ठराव मंजूर.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : तालुक्यातील वावडे गावाने सहकार क्षेत्रात साधेपणा आणि एकमताचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. वावडे येथील मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने मा. नगरसेविका सौ. गायत्री दिपक पाटील यांच्या नावाचा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा ठराव एकमताने मंजूर केला.

या ठरावाची विशेष बाब म्हणजे, ठरावासाठी आवश्यक झेरॉक्स प्रतींसाठी अवघा दोन रुपयांचा खर्च झाला. कोणताही अनावश्यक खर्च न करता अत्यंत साधेपणाने प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने हा निर्णय तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक मणिलाल पाटील यांच्या पत्नी सौ. गायत्री दिपक पाटील यांच्या नावाला संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
दरम्यान, यापूर्वी दिपक पाटील यांच्या नावाचा शेतकी संघासाठीही ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. दिपक पाटील हे सध्या वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
दिपक मणिलाल पाटील हे सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य आणि गावाच्या विकासाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. तसेच अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये मागील पंचवार्षिक काळात सौ. गायत्री पाटील यांनी विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
संचालक मंडळाने त्यांच्या कार्यावर दाखविलेला विश्वास हा नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
अवघ्या दोन रुपयांच्या खर्चात मंजूर झालेला हा ठराव आणि संचालक मंडळाची एकमताची भूमिका सहकार क्षेत्रातील साधेपणा व पारदर्शकतेचा आदर्श ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या ठरावासाठी सहकार्य करणाऱ्या वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाचे तसेच वावडे ग्रामस्थांचे दिपक पाटील व गायत्री पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

