पातोंडा जिल्हा परिषद शाळेत राखी तयार करण्याची स्पर्धा उत्साहात.
अमळनेर/आबिद शेख

पातोंडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पातोंडा येथे धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुताई अवकाळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकर्षक साहित्य आणि कल्पकतेचा वापर करून सुंदर राख्यांची निर्मिती केली.
स्पर्धेत अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. स्पर्धेचे बक्षीस वितरण गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख महेश पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरी पाटील, द्वितीय क्रमांक गणेश दत्तात्रय संदानशिव, तृतीय क्रमांक रिषभ राहुल लांबोळे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक राजेश्वरी पारधी हिला मिळाले. विजेत्यांना चित्रकला वही, रंगपेटी, कंपास व सचित्र बालमित्र पुस्तके अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती प्रतिभा पाटील, सौ. छाया इसे, श्रीमती सुषमा तायडे, श्री. सुनील सोनवणे व श्रीमती वैशाली बोरसे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कलागुणांना चालना मिळाल्याचे दिसून आले.

