आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनंतर पूरग्रस्तांना दिलासा; अमळनेरातील २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप..

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर शहरातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देत पिंपळे रोडवरील शंकरनगर, बाजार समितीमागील गुरुकृपा कॉलनी आणि संताजीनगर परिसरातील सुमारे २५० लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप २० ऑगस्ट रोजी करण्यात आले.
३१ जुलै रोजी अमळनेर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोरी नदी व पिंपळे नाला परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद हद्दीतील १,८०० पूरग्रस्त नागरिकांना यापूर्वी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले होते.


मात्र काही पूरग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहिल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे व नगरसेवक सचिन पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदार पाटील यांनी प्रशासनाला अतिरिक्त किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी संबंधित भागातील सुमारे २५० लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले.
शंकरनगर येथील श्रीरंग कॉलनीत माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते १४६ लाभार्थ्यांना किट देण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका योगिता कापडणेकर उपस्थित होत्या.


दरम्यान, गुरुकृपा कॉलनी व संताजीनगर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे १०० लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, वेद राजेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed