बदलत्या वयातील जाण-भान : मुलींसाठी महाराष्ट्रभर ५१ कार्यशाळांचे आयोजन.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने मुलींसाठी ‘बदलत्या वयातील जाण-भान’ या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात ५१ कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बदलांविषयी योग्य जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांना आत्मविश्वासाने या बदलांना सामोरे जाण्यास सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळांमध्ये प्रेम आणि आकर्षण यातील फरक, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील भेद, कुटुंब व समाजाप्रती असलेली जबाबदारी, मासिक पाळी व्यवस्थापन व व्यायाम, शरीर आणि मन मजबूत व निरोगी ठेवण्याचे मार्ग तसेच किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल याबाबत मार्गदर्शन व चर्चा केली जाणार आहे.


‘मुलींनो, बौद्धिक सौंदर्य वाढवा; बुद्धीचा मेकअप करा’ या संदेशातून मुलींना केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे


या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, शाळा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग, सूचना व सहकार्य याबाबत प्रतिष्ठानशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपली मदत आणि सूचना या दोन्हींचे स्वागत आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यशाळेसाठी संपर्क :
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
📞 ९०७५५७०५१०

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed