रवि ज्वेलर्सचा गरजूंना मदतीचा हात; फोटोग्राफर्सचा सन्मान.

0

अमळनेर/आबिद शेख.                                          जागतिक मानवता दिनाचे औचित्य साधून रवि ज्वेलर्सतर्फे शहरातील गरजू व्यक्तींना अन्नकिटचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत मानवतेची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या अन्नकिटचे वितरण करण्यात आले.


याचवेळी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अमळनेर शहरातील फोटोग्राफर्सचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील विविध क्षण, संस्कृती आणि आठवणी जतन करणाऱ्या फोटोग्राफर्सच्या कार्याचा गौरव करण्यात आला. फोटोग्राफी क्षेत्रातील योगदानाबद्दल रवि ज्वेलर्सतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


तसेच पूरग्रस्त फोटोग्राफर्स असोसिएशनला मदत म्हणून आर्थिक स्वरूपाचे योगदान देण्यात आले. संकटाच्या काळात फोटोग्राफर बांधवांच्या पाठीशी उभे राहत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
मानवसेवा हीच खरी समाजसेवा असून, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी भविष्यातही विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प रवि ज्वेलर्सतर्फे व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाबद्दल फोटोग्राफर्सनी रवि ज्वेलर्सचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास शहरातील फोटोग्राफर्स, नागरिक तसेच रवि ज्वेलर्सचे रवि वर्मा व निखिल वर्मा बंधू उपस्थित होते.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed